स्टोरी

कलंबिस्त येथील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बाळकृष्ण मेस्त्री यांचे निधन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गणशेळवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बाळकृष्ण मेस्त्री वय वर्ष ७० यांचा राहत्या घरी मृतदेह आढळून आला आहे. गेले दोन दिवस ते घरातून बाहेरच पडले नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी याबाबतची खबर पोलीस पाटील प्रियांका सावंत यांना दिली. पोलीस पाटील प्रियांका सावंत घटनास्थळी आल्यानंतर घरचा दरवाजा उघडला असता ते मृता अवस्थेत आढळून आले. विवाहित मुलगा अंकुश याला याबाबत कल्पना देण्यात आली आहे. तो गोवा येथे कामाला आहे. तर मोठा मुलगा मुंबई येथे राहतो. घरी ते एकटेच होते.अधिक तपास पोलीस करत आहेत.


Spread the love

Related posts

सातुळी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news

कै. उदय खानोलकर वाचन मंदिर, मळगावच्या अनोख्या दिवाळी अंक योजनेंतर्गत दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

news

कलंबिस्त गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दिनेश सावंत यांची दुसऱ्यांदा फेरनिवड.

news

Leave a Comment