स्टोरी

बांदिवडे येथे १० मे रोजी रंगणार ‘नको जाळूस घरटे माझे’ नाटकाचा प्रयोग!.

Spread the love

​​मसुरे प्रतिनिधी: बांदिवडे येथे श्री देवी महालक्ष्मी देवी मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त, श्री देव लखमेश्वर नाट्य मंडळ, बांदिवडे यांच्या वतीने एक विशेष सांस्कृतिक मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. प्रसिद्ध लेखक महाबळेश्वर सैल लिखित, तीन अंकी संगीत हृदयस्पर्शी सामाजिक नाटक ‘नको जाळूस घरटे माझे’ याचा प्रयोग १० मे २०२६ रोजी रात्री ठिक १०:३० वाजता. आयोजित करण्यात आला आहे.​या नाटकाचे दिग्दर्शन आशिष नाबर यांनी केले असून, सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सौ. संस्कृती बांदिवडेकर यांनी सांभाळली आहे.

या नाटकाची निर्मिती खोरवाडी ग्रुप परिवार व सह-निर्मिती श्री. अमरनाथ गणपत मुणगेकर यांची आहे.​नाटकाला साजेसे संगीत अक्षय सातर्डेकर (हार्मोनिअम), साईश खोत (तबला) आणि श्री सत्यवान नाईक (पाश्वसंगीत) यांनी दिले आहे. तसेच नेपथ्य व प्रकाश योजनेची जबाबदारी प्रथमेश रंगमंच (मळगाव) यांनी स्वीकारली आहे.​या नाटकात सतीश बांदिवडेकर, हिरेश मुणगेकर, अरुण मिठबांवकर, रवींद्र कांबळे, प्रदीप अंधारी, अजय पडवळ, विराज परब, देवेंद्र परब, भूषण प्रभू, शाहूलखन बांदिवडेकर आणि सौ. संस्कृती बांदिवडेकर यांसारखे मातब्बर कलाकार आपली कला सादर करणार आहेत.​रंगभूषा व वेशभूषा संजय जोशी यांची असून ध्वनीसंयोजन जयबजरंगबली साउंड सर्व्हिस (मसुरे कावावाडी) यांचे आहे.​या दर्जेदार सामाजिक नाटकाचा लाभ घेण्यासाठी सर्व नाट्यप्रेमींनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव लखमेश्वर नाट्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया…! – ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

news

लावण्यसिंधू व सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे महिलादिन उत्साहात..

news

होळीच्या मुहूर्तावर कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरा देवस्थान येथे नव्याने देवस्थानच्या नावाच्या फलकाचे अनावरण.

news

Leave a Comment