स्टोरी

केनिया नैरोबी येथे होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून सुमारे ६० साहित्यिक, लेखक, कवी रवाना.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी विभव इंटरनॅशनल एज्युकेशन आणि सोशल फोरम व महाराष्ट्र मंडळ नैरोबी यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन नैरोबी केनिया येथे २ मे रोजी होत आहे. या साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी एक मे रोजी केनिया येथे कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे गीत केनियामध्ये घुमले. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने केनिया नैरोबी येथे या महाराष्ट्र गीताला दाद दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या वतीने हे दुसरे मराठी साहित्य संमेलन भरत आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून हे दुसरे आंतरराष्ट्रीय मराठीसाहित्य संमेलन केनिया या देशात होत आहे. यासाठी महाराष्ट्रातून सुमारे ६० साहित्यिक, लेखक, कवी, रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे या मराठी साहित्य संमेलन केनिया येथे होत आहेत. त्या आयोजन समितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी राज्याचे माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर व राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून पहिले आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा हे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन केनिया येथे होत आहे.

शनिवारी २ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात हे संमेलन होणार असून या संमेलनात मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे उपस्थित राहणार आहेत. तर संमेलन अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे, स्वागताध्यक्ष डॉक्टर ज्योती त्रिवेदी, महाराष्ट्र मंडळ नैरोबी चे प्रशांत मोहिते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिताकीर कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ, महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्त अजय आपटे, समीर मुनाशी, संदीप पाटणक, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, सादर करते प्रसाद कुलकर्णी, दिलीप पांढरपट्टे, प्राध्यापक अरुण म्हात्रे उपस्थित आहेत.

समारोप सायंकाळी पाच तीस ते सहा संमेलन अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, उद्घाटक महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष प्रशांत मोहिते आदींच्या उपस्थित होणार आहे. या आयोजन समितीमध्ये संजय केळकर, अनुप कर्णिक, नमिता कीर, प्राध्यापक प्रदीप ढवळ, दीपा ठाणेकर, सुधीर शेटे, मंगेश मस्के, प्राध्यापक हर्षला लिखिते, मंदार टिल्लू, गौतम थोरवे, अमोल आपटे, दिलीप ठाणेकर, डॉक्टर जालंदर भोर, डॉक्टर ज्योती त्रिवेदी, अजय आपटे, समीर मुनाशी, संदीप पाटणकर, मकरंद कुलकर्णी, प्रशांत मोहिते, नवनाथ वायकर,, अशोक पवार आधी उपस्थित होते.

भारताचा तिरंगा झेंडा केनिया येथे आज झळकत होता. मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे रूप तेथे अनुभवता आले. याबद्दल तेथील साहित्य मंडळाने कौतुक केले. भारताचा तिरंगा झेंडा हातात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोकण मराठी साहित्य परिषदेचे कणकवली येथील श्री वालावलकर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मळगाव येथे आज १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा…! मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजन.

news

महाराष्ट्रातील सर्व कारागृहांची एकूण कैद्यांची क्षमता २४ हजार आणि कैदी ४२ हजार! अमिताभ गुप्ता

news

सोनुर्ली प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

Leave a Comment