स्टोरी

मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.

Spread the love

सावंतवाडी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा‘ हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र दिन व सिंधुदुर्ग स्थापना दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फीत कापून रुग्णवाहिका रुग्णसेवेस सज्ज करण्यात आली. यावेळी सामाजिक बांधिलकी रूग्णांना करत असलेली मदत अमुल्य आहे. आम्हाला त्याची जाण असून सावंतवाडीच्या आरोग्य समस्याही लवकरच दूर होऊन जनतेच्या लढ्याला यश मिळेल असा विश्वास श्री.भोसले यांनी व्यक्त केला. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते‌. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या रूग्णवाहिकेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

कै. अनिल उर्फ आबा परूळेकर यांनी पाहिलेल स्वप्न आज पूर्ण होत आहे‌. समाजातील दानशूर लोकांच्या देणगीतून आम्ही ही रूग्णवाहिका घेतली असून मोफत सेवा देण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी सांगितले. तर सामाजिक बांधिलकीचे काम आम्ही जवळून पाहिले असून आज रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रूग्णसेवेत प्रतिष्ठानला अधिक बळ मिळेल असा विश्वास पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी व्यक्त केला. दरम्यान, जनतेच्या हक्काची रूग्णवाहिका आपल्या सेवेत आली आहे. रुग्णांना सहाय्यक करण्याचे काम सामाजिक बांधिलकी करते. बेवारस रुग्णांना धावून जाणारी ही मंडळी असल्याने प्रशासनाला देखील त्यांचा फायदा होतो असे उद्गार वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी काढले.

यावेळी युवराज लखमराजे भोंसले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे,पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, उद्योजक शैलेश पै, सामाजिक कार्यकर्ते आनंद रासम, प्रा. सुभाष गोवेकर, अनंत उचगावकर, राजू केळूसकर, जितेंद्र मोरजकर, उदय अळवणी, राजू मसुरकर, एन.बी. रेडकर, ज्येष्ठ नागरिक अरूण मेस्त्री, सोमनाथ जीगजिन्नी, सुधीर पराडकर, रविंद्र माने, राम वाडकर, चंद्रकांत घाटे, प्रवीण सुर्यवंशी, प्रवीण केसरकर, सुनिल नाईक, अभिमन्यू लोंढे, प्रसाद परब, पोलिस श्री. निरवडेकर, सौ.धोंड, सौ. रेडकर, अनुजा साळगांवकर, श्री. पावसकर, राजू धारपवार आदींसह सामाजिक बांधिलकीचे प्रा. सतिश बागवे, प्रा. शैलेश नाईक, रवी जाधव, संजय पेडणेकर, लक्ष्मण कदम, रुपा मुद्राळे, शरदिनी बागवे, समिरा खलिल, हेलन निब्रे, शेखर सुभेदार आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

डॉ. मधुरा सुर्वे ‘एमएच उमन एक्सलेंस २०२६’ पुरस्काराने सन्मानित.

प्रसाद परब

कारिवडे येथिल श्री देवी कालिका मंदिरात दि.२२ जानेवारी दिवशी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार…!

news

मुणगे तिठा हायमास्टच्या प्रकाशाने उजळला..! आम. नितेश राणे यांचे मानले ग्रामस्थांनी आभार

news

Leave a Comment