शिक्षण

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या पहिल्या तुकडीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

Spread the love

मुळदे: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) पहिल्या तुकडीचा (२०२३-२६) निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. “पहिल्या एनसीसी तुकडीचा सन्मान – From First Parade to Final Salute” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक तुकडीने ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ही तुकडी महाविद्यालयातील एनसीसी युनिटची पहिली तुकडी असल्याने संस्थेच्या इतिहासात त्यांना विशेष स्थान प्राप्त झाले आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अजित राणे (अध्यक्ष, राणे मेडिकल रिसर्च सेंटर, कुडाळ) उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून एनसीसीचे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करण्याचे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी डॉ. एस. एस. गुरव (शिक्षण प्रभारी), डॉ. गिरीश उईके (एनएसएस प्रभारी), बीएचएम बलवंत सिंग (पीआय स्टाफ, ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी), प्रा. हर्षवर्धन वाघ (सीटीओ, एनसीसी युनिट) तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यावेळी एनसीसी कॅडेट्सचा ज्युनिअर कॅडेट्सतर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘एनसीसी-सी’ प्रमाणपत्र पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हा क्षण सर्वांसाठी अभिमानास्पद व भावनिक ठरला.कार्यक्रमात कॅडेट जानकी साळुंके व कॅडेट सिमिन गार्दी यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ व कनिष्ठ कॅडेट्सनी आपल्या एनसीसी प्रवासातील अनुभव कथन केले.या वेळी महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता व माजी कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांचे एनसीसी युनिट स्थापनेतील मोलाचे योगदान विशेषत्वाने नमूद करण्यात आले.

तसेच सर्व माजी सहयोगी अधिष्ठात्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाचा समारोप कॅडेट साईराज नारवेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Spread the love

Related posts

शिक्षण विभागाच्या अजब जीआरमुळे माध्यमिक शिक्षण संस्था तसेच शिक्षक वर्गाची बोळवण..!

प्रसाद परब

खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कळसुलकर हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

news

विनया सातार्डेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद…! किशोर काळे.

news

Leave a Comment