शिक्षण

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील तीन विद्यार्थी गुणवता यादीत.

Spread the love

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील विद्यार्थी दिक्षा महेंद्र मेस्त्री ही जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवी व रत्नागिरी तालुक्यात प्रथम, हर्ष महेश धाडवे हा जिल्हा गुणवत्ता यादीत २६ वा तर रत्नागिरी तालुक्यात चौथा, सत्वशील सहदेव गुरव जिल्हा गुणवत्ता यादीत ११२ वा तर तालुक्यात ११ येऊन हे तीन विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी मध्ये गुणवत्ताधारक झाले आहेत.

 

जि.प.च्या मराठी माध्यमाच्या ऐकाच शाळेतील या तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

यामध्ये जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं. १ या शाळेतील ऐकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड होण्याबरोबरच या अगोदर याच तिघांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली असून त्यांच्या या यशामागे प्रशालेतील प्रमुख मार्गदर्शक शिक्षक मारुती घोरपडे हे आहेत. मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ आदींचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे पालकमंत्री सामंत, आमदार किरण सामंत, कोकण विभागीय परीक्षा मंडळ सहसचिव प्रेरणा शिंदे, रत्नागिरी तालुका पं. स.गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर आदींनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कळसुलकर हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

news

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या पहिल्या तुकडीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

प्रसाद परब

सावंतवाडी येथील शाळा सावंतवाडी नं ६ चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

news

Leave a Comment