स्टोरी

सावंतवाडी कारागृहातील बंदी बांधवांसाठी योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: जागतिक योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योग हा व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार आहे. ज्याच्या माध्यमातुन केवळ शरीराच्या विविध अवयांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. कारागृहाच्या आत चारभितीमध्ये बंदी जनामध्ये स्वस्थ निरोगी शांततापूर्ण जिवन जगण्यासाठी योग अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण आहे.


bullbahis
तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनः शांती टिकवुन ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग त्यानुसार जागतिक योग दिनानिमित्त” जिल्हा विधी सेवा प्राधिरिकरण, ओरोस व तालुका विधी सेवा यांचे सयुक्त विद्यमाने ” जीवनविद्या मिशन, उपकेंद्र सावंतवाडी यांचे योग प्रशिक्षक डॉ. निलेश अटक,‌ याचेमार्फत दिनांक २१.०६.२०२५ रोजी सावंतवाडी जिल्हा कारागृहातील बंद्यासाठी योग दिन साजरा करण्यात आला. सदर शिबीरात एकुण ३८ बदंयानी सहभाग नोंदविला.

योग प्रशिक्षक डॉ. निलेश अटक, यांनी विविध योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातुन मानसिक आणि शाररीक संतुलन कसे राखले जाते याबाबत महत्व सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिरिकरण, ओरोस व तालुका विधी समिती, सांवतवाडी यांनी आयोजित कलेल्या शिबिराबाबत मान्यवरांचे कारागृह अधिक्षक सतिश कांबळे यांनी आभार व्यक्त केले.


Spread the love

Related posts

मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे १९ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम!

news

आजगांव मध्ये उद्या श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्यपरिवार आयोजित ‘गुरूवंदना सोहळा’!

news

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत रुपेश परब अव्वल.

news

Leave a Comment