स्टोरी

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे २६ एप्रिल रोजी पुण्यतिथी उत्सव!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी २६ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने २३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड (ता. देवगड) येथे विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२३ ते २५ एप्रिल २०२५ सकाळी ९:३० ते दुपारी १:०० श्री स्वामी समर्थ सामूहिक नामस्मरण सोहळा,शनिवार २६ एप्रिल २०२५ रोजीसकाळी ७:०० ते ९:३० वा. श्री गणेश पूजन, पादुका पूजन व होमहवन,सकाळी ९:३० ते १२:३० सामूहिक नामस्मरण,दुपारी १२:३० ते १:०० महाआरती,दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद,दुपारी ३:०० ते ४:००,श्री स्वामी कृपा तारक मंत्र व अष्टक,दुपारी ४:०० ते ६:०० वा .संगीत भक्तीरस सोहळा,सायंकाळी ६:०० ते ८:०० वा भावसरगम उत्सव आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी (मुंबई) संचलित श्री स्वामी समर्थ मठ, हडपीडचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण श्री. नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त खजिनदार श्री. ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.
२३ ते २५ एप्रिल या कालावधीत सामूहिक नामस्मरण सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांनी मठाचे पुजारी शिवलिंग जंगम (९०२१८१४९४२) यांचेशी संपर्क साधावा.सामूहिक नामस्मरणसाठी येणाऱ्या भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था मठाच्या वतीने केली जाईल.


Spread the love

Related posts

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी कृष्णा राऊळ.

news

तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा.

news

चिकित्सेसाठी विदेशी संगीतापेक्षा भारतीय संगीत अधिक परिणामकारक! महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष……

news

Leave a Comment