स्टोरी

माणगांवच्या श्री. वा. स. वाचनालयात महिला दिन साजरा.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: २०२५ साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आहे. संपूर्ण भारतभर त्यांची जयंती साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय, माणगांव येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा थोडक्यात परिचय करून देणारा कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम श्री. वासुदेवानंद सरस्वती वाचनालय, हेडगेवार प्रकल्प तेजस्विनी महिला समिती आणि राष्ट्र सेविका समिती, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. डॉ. मेधा फणसळकर आणिवाचनालयच्या अध्यक्षा स्नेहा फणसळकर आणि डॉ. मेधा फणसळकर यांनी अहिल्यादेवींचा जीवनपट गोष्टीरूपात सादर केला. यावेळी खुशी धुरी, वीणा सावंत आणि मनिषा सावंत यांनी अहिल्यादेवींचे बालपण, तरुणपण आणि प्रौढपणीचे रूप साकारले. तर राष्ट्र सेविका समितीच्या महिलांनी अहिल्याबाईंचा गोंधळ सादर केला. हा कार्यक्रम वाचनालयच्या अध्यक्षा स्नेहा फणसळकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रमुख पाहुण्या म्हणून माणगांवच्या विद्यमान सरपंच सौ. मनिषा भोसले उपस्थित होत्या. यावेळी वाचनालायचे संचालक स्नेहा माणगांवकर, शरद कोरगावकर, मेघःशाम पावसकर, ग्रंथापाले प्रज्ञा कविटकर, माजी अध्यक्ष कॅ. खोचरे, अपूर्वा चव्हाण, स्नेहा चव्हाण, मृणाल देसाई तसेच वाचनालायचे कर्मचारी, तेजस्विनी महिला समितीच्या सदस्या तसेच राष्ट्र सेविका समिती, सावंतवाडी शाखेच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.


Spread the love

Related posts

कै. उदय खानोलकर वाचन मंदिर, मळगावच्या अनोख्या दिवाळी अंक योजनेंतर्गत दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

news

सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे कथा स्पर्धेचे आयोजन.

news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सुपूर्द.

news

Leave a Comment