स्टोरी

सावंतवाडी कलंबिस्त पंचक्रोशी मर्यादित दुग्ध व्यावसायिक संस्थेतर्फे दिवाळी भेट व बोनस वाटप.

Spread the love

सावंतवाडी (कलंबिस्त): कलंबिस्त दुग्ध व्यवसायिक पंचक्रोशी मर्यादित दुग्ध व्यवसाय संस्था तर्फे दूध शेतकरी बांधवांना दिवाळी भेट व बोनस वाटप उपक्रम करण्यात आला. यावेळी दूध संकलन करणारे राजन घाडी व माजी उपसरपंच रेश्मा सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दूध संस्थेचे चेअरमन एडवोकेट संतोष सावंत म्हणाले, गेली सात वर्ष सातत्याने या पंचक्रोशीत ही पहिली दुग्ध संस्था आहे. या दुग्ध संस्थेने दरवर्षी दूध शेतकऱ्यांना सन्मान म्हणून दिवाळी भेट आतापर्यंत देत आली आहे. यावेळी दूध शेतकरी बांधवांना गोकुळ कडून उपलब्ध होणारा बोनस वाटप थेट खात्यात करण्यात आला आहे. तर संस्थेतर्फे दिवाळी भेट देण्यात आली आहे. असा उपक्रम सातत्याने घेतला जाईल. या भागात पशुसंवर्धन मध्ये अधिक क्रांती करण्यच्या दृष्टीने सर्वसामाजिक राजकीय आदी क्षेत्रातील व्यक्तींच्या सहकार्याने येत्या काळात दूध संकलन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना गायी, म्हशी वाटप उपक्रम हाती घेण्याचा संकल्प आहे.असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संस्थेचे सचिव रमेश सावंत, संचालक लक्ष्मण राऊळ, प्रकाश तावडे,  शशिकांत सावंत, दूध संकलन करणारे राजन घाडी, सिद्धेश सावंत, रेश्मा सावंत, बाळू सावंत, श्री राऊळ, लहू राऊळ आधी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

शैक्षणिक साहित्य ठराविक विक्रेत्यांकडून खरेदी विरोधात कारवाई करा..! सुराज्य अभियान

news

वाढदिवसाच्या औचित्य साधून न्यू इग्लिश स्कूल कसाल या शाळेत ४०० रामरक्षा या लघुग्रथाचे मुलांना वितरण

news

माहिमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल!

news

Leave a Comment