स्टोरी

२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार.

Spread the love

सिंधुदुर्ग: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आमदार वैभव नाईक आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रथमतः सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील एसटी स्टॅंड कडून पोलीस स्टेशन मार्गे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाकडे जात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणेकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्या सौजन्याने जन सेवार्थ पार्थिव शरीर शीतपेटीचे लोकार्पण!

news

सर्व समावेशक कार्य प्रणालीमुळे महेश इंगळे आयकॉन पुरस्काराचे मानकरी….

news

वकृत्व स्पर्धेत कार्तिकी कासार प्रथम.

news

Leave a Comment