राजकारण

कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं नाही किंवा त्यांना अटकही करण्यात आलेली नाही.

Spread the love

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी एक व्हिडीओ शेअर करून दापोलीतून सदानंद कदम यांना अटक केल्याचं म्हटलं होतं. सदानंद कदम हे अनिल परब यांचे सहकारी आहेत. सदानंद कदम यांच्या अटकेच्या बातमीमुळे खळबळ उडाली होती. मात्र, अजूनतरी सदानंद कदम यांना अटक केल्याबाबतची कोणतीही माहिती ईडीकडून देण्यात आली नव्हती. त्यानंतर सदानंद कदम यांची त्यांच्या दापोलीतील कुडेशी गावी जाऊन ईडीने चौकशी केली. चौकशीनंतर कदम यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अधिक चौकशीसाठी मुंबईला नेत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण हे वृत्तही खरं नसल्याचं समोर आलं आहे. कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं नाही किंवा त्यांना अटकही करण्यात आलेली नाही. कदम यांना ईडीने चौकशीसाठी मुंबईला येण्यास सांगितलं आहे. अशी माहिती मिळत आहे.


Spread the love

Related posts

चुंबनावरून SIT होते अन् गरीब मुलीवर बोलल्याने खासदारावर गुन्हा, कायदा व सुव्यवस्था कोठ्यावर नाचतेय! संजय राऊत यांचा हल्लाबोल!

news

शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरा जावे! प्रागतिक पक्षांच्या संयुक्त बैठकीत प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे मुंबई येथे आवाहन.

news

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाचे आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका .

news

Leave a Comment