स्टोरी

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: काल रविवार दि. ५ ऑगस्ट रोजी शाळेच्या सभागृहात देशभक्तीपर समूहगीत गायनाच्या सरावासाठी आलेला इयत्ता नववी ब चा साईल महेश हवालदार या विद्यार्थ्यांने त्याला सापडलेले एक हजार रुपये आपल्या वर्ग शिक्षिका सौ बांदेलकर यांच्याकडे दिले. चौकशी केली असता शाळेत आलेल्या पाटणकर गॅस सर्विस चे श्री .सुनील तोरस्कर यांचे ते पैसे असल्याचे निदर्शनास आले. त्यांना बोलावून त्यांचें पैसे त्यांना सुपूर्द करण्यात आले. साईलच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी त्याचे ,वर्गशिक्षकांचे आणि शाळेचे कौतुक केले व आभार मानले. प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस व्ही भुरे यांनीही साईलचे खूप कौतुक केले आहे.


Spread the love

Related posts

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विदेशी झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी केला विरोध!

news

योगिता टिळवे ठरल्या पैठणीच्या मानकरी.

news

सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणारा नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य व्हावा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

news

Leave a Comment