शिक्षण

दहावी, बारावी परीक्षेतील कुडाळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २३ जून रोजी होणार गुणगौरव सोहळा…! आमदार वैभव नाईक

Spread the love

आमदार वैभव नाईक व कुडाळ युवासेनेच्या वतीने आयोजन

 

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी, बारावी (शाखा निहाय प्रथम ३) परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक व युवासेना कुडाळच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. रविवार २३ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हा गुणगौरव सोहळा संपन्न होणार असून आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, अभय शिरसाट, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,नगराध्यक्षा अक्षता खटावकर,उपनगराध्यक्ष किरण शिंदे, श्रेया परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.तरी कुडाळ तालुक्यातील सर्व शासकीय व खाजगी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ तालुका युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

MHT CET परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर होणार!

news

मसूरे बागवे हायस्कुल येथे ‘मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस’ उत्साहात साजरा

news

पळसंब जी. प. शाळा येथे अत्याधुनिक प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा संपन्न.

प्रसाद परब

Leave a Comment