स्टोरी

एनडीएला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतीनी दिली ७ जून पर्यंत वेळ

Spread the love

लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार.

५ जून वार्ता: पडल्यानंतर आता एनडीएकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसंच सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींनी त्यांना ७ जून हि तारीख दिली आहे.

 

भारताच्या१४० कोटी देशवासियांनी मागील दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या लोककल्याणकारी धोरणांमुळं देशाच्या प्रत्येक क्षेत्राला विकसित होताना पाहिलं आहे. बऱ्याच काळापासून भारताच्या जनतेनं सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतानं सशक्त नेतृत्वाची निवड केली आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक एनडीएनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एकजुटीनं लढली आणि जिंकली. आम्ही सर्वजण एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांना सर्वसंमतीनं आमचा नेता म्हणून निवड करतो. मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार भारताच्या गरीब-महिला-तरुण शेतकरी आणि शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांच्या सेवेसाठी प्रतिबद्ध आहे. भारताचा वारसा संरक्षित करुन देशाच्या सर्वांगिण विकासासाठी एनडीए सरकार भारताच्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी काम करत राहिल. हा प्रस्ताव दि. ५जून ला नवी दिल्लीत मंजूर झाला आहे.


Spread the love

Related posts

एकाच मोबाईल नंबरवर लाखो लोकांची नोंदणी,’आयुष्मान भारत’ योजनेत घोटाळा? कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा!

news

अतिक्रमणांविरोधात व्यापक जागरणाची आणि कायदेशीर लढ्याची आवश्यकता ! श्री. उमेश गायकवाड, माजी प्रांत संयोजक, बजरंग दल

news

फॅशन म्हणून निवडणूक लढवू नका तर जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा..! रवी जाधव 

news

Leave a Comment