स्टोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सुपूर्द.

Spread the love

५ जून वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी दुपारी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपुर्द आहे. कॅबिनेटच्या बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर केला आहे. नवीन सरकार येईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती मुर्मूंनी हा राजीनामा स्विकारला असून आजपासून मोदी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदावर कायम राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपला बहुमत मिळवता आले नसले तरी एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. येत्या ८ किंवा ९ जून रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.भारतीय जनता पक्षाने – २०१४ मध्ये २८२ जागा आणि २०१९ च्या निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी त्यांना २४० जागाच जिंकता आल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा भाजपकडे ३२ जागा कमी आहेत. त्यामुळे यावेळी एनडीएच्या घटक पक्षांनी जिंकलेल्या ५३ जागांवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूसारख्या पक्षांकडे यावेळी सत्तेची चावी असण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात टीडीपीने १६ जागा तर बिहारमध्ये जेडीयूने १२ जागा जिंकल्या आहेत.


Spread the love

Related posts

विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनकाळात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी करतात मद्य-मांसाच्या मेजवान्या !

news

सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर सरकारने मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ.

news

भरोसा सेल सिंधुदुर्ग मार्फत गोदरेज फॅक्टरी कुडाळ एम. आय. डी. सी. येथील महिला कामगारांकरीता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.

news

Leave a Comment