स्टोरी

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे ६ मे रोजी स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स. ७:०० ते १०:०० पादुका पूजन, होमहवन, स. १०:३० ते १२:०० नामस्मरण, दुपारी १२.०० ते १:०० महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ४:०० श्री स्वामी कृपा तारकमंत्र, दुपारी ४:०० ते ६:०० शिरगाव वारकरी सांप्रदाय यांचा विठूनामाचा हरिपाठ, सायं ६:०० ते ८:०० कलाप्रेमी कराओके सिंगीग क्लब देवगड यांचा अभंगवाणी अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई, श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) व गाव समिती (हडपीड देवगड) यांच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव तथा अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

पोलीस स्टेशन नजीक मुख्य रस्त्यावर पडलेल झाड सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हटवलं.

प्रसाद परब

बांदा येथील शिवराम धोंडीराम चव्हाण (२४) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

news

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक आमच्या ताब्यात द्या! आनंद शिंदे….

news

Leave a Comment