स्टोरी

शिवकालीन युद्धकलेची आज सावंतवाडीत नेत्रदीपक प्रात्यक्षिके.

Spread the love

सावंतवाडी: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, अभिनव फाऊंडेशन, सिंधुदुर्ग तफेँ शिवकालीन युद्धकलेच्या सादरीकरणाचा जाहीर कार्यक्रम आज बुधवारी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे.

शिवकालीन परंपरेचा वारसा जपत, नवीन पिढीला शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने अभिनव ने गेले दहा दिवस कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यात विविध वयोगटातील मुलामुलींनी भाग घेतला व प्रशिक्षण प्राप्त केले. फिरंगोजी शिंदे आखाडा,कोल्हापुर यांनी प्रशिक्षण दिले.

या युद्धकलेच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाचा जाहीर कार्यक्रम  बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे सायंकाळी ६.०० वा. आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; असे आवाहन अभिनव फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

कुडाळ इंग्लिश मीडियम संघर्ष समितीचे हे आंदोलन का व कशासाठी?

news

सुकळवाड उपकेंद्र व ग्रामसंघ परिसरात स्वच्छता अभियान..!

प्रसाद परब

मसुरे केंद्र शाळा येथे आजी आजोबा रमलेत अनोख्या विश्वात…

news

Leave a Comment