शिक्षण

तरळे ज्ञानवर्धीनी नर्सिंग काॅलेजवर विध्यार्थीनींनी केला फसवणूकीचा आरोप.

Spread the love

सिंधुदुर्ग मनसेच्या शिष्टमंडळाने विचारला त्या विद्यालयाच्या अधिकरीवर्गाला जाब.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील काही विद्यार्थीनीनी  ज्ञानवर्धीनी नर्सिंग काॅलेजवर आरोप करत त्या संदर्भात मनसे विद्यार्थीसेनेकडे मदत मागीतली होती. याची दखल घेत सिंधुदुर्ग मनसे शिष्ट मंडळाने तडकाफडकी जाऊन काॅलेजच्या चेअरमन आणि मुख्याध्यापकांना जाब विचारला आहे. त्या काॅलेज मध्ये प्रवेशावेळी मुलींना सांगीतलेल्या सुविधा पैसे भरून पण दिल्या नाहीत.  काॅलेज कॅम्पस मध्ये हाॅस्टेल नाही, आम्ही पब्लिक प्लेस मध्ये राहतो. तसेच त्यांनी आम्हाला सांगीतल होत कि आमची पोस्टींग मुबंई, पुणे, कोल्हापुर अशा ठिकाणी लागेल. पण आम्हाला सिनीअर्स कडून समजल कि तुमची पोस्टींग कणकवली येथील पाकळे हाॅस्पिटल मध्ये झालेली आहे. तसेच काॅलजच्या लॅयब्ररीत जी. एन. एम. ची पुरेशी पुस्तक उपलब्ध नाहीत आणि लॅब मध्ये पुरेशी इंस्ट्रुमेट उपलब्ध नाहीत. हे नर्सिंग काॅलेज असुन इथे दोनच शिक्षक उपलब्ध आहेत. काॅलेजची सावंत म्हणून एक शिक्षीका या अश्लिल शब्दात आमच्याशी वर्तवणुक करतात. या अशा अनेक कारणामुळे आम्हाला हे काॅलेज सोडायच आहे. तरी वरील विषयाची मध्यस्थी करून आपण आमचे मुळ कागदपञ आणि भरलेली फि आम्हास परत मिळवून द्यावी. आशा प्रकारचा आशय असलेलं पञ मनसे कडे आले. त्यामुळे मनसे शिष्टमंडळाने भेट घेऊन याबाबत त्या काॅलेजच्या अधिकारी वर्गावर भडीमार केला.  काॅलेजच्या अधिकारी वर्गानी मनसे शिष्ट मंडळाला  शब्द दिला कि या प्रश्नाची लवकरात लवकर पुर्तता करून देऊ.


Spread the love

Related posts

तर ग्रामीण भागातील शाळा कायमस्वरूपी बंद पडतील..! माजी सभापती उदय परब

news

डॉ. राम मेस्त्री देवरुख कॉलेजचे भूषण..! प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांचे प्रतिपादन.

news

लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयांमध्ये फ्रेशर्स पार्टी साजरी…!

news

Leave a Comment