स्टोरी

बायकोनेच साथीदारांच्या मदतीनं रचला नवऱ्याला जीवे मारण्याचा कट…!

Spread the love

३१ जानेवारी वार्ता: प्रॉपर्टी हडपण्यासाठी बायकोनेच साथीदारांच्या मदतीनं कट रचत नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नाशिकच्या बोरगड परिसरात घडला आहे. बिअर पाजून पत्नीनं पतीला सर्पदंश करून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत सुदैवानं पीडित पतीचा जीव वाचला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बायकोने नवऱ्याला बिअर पाजवून महिलेनं आपल्या दोन साथिदारांच्या मदतीनं आधी पतीचं तोंड उशिनं दाबलं, नंतर त्याचा गळाही आवळण्यात आला, त्यानंतर त्याला संर्पदंश करण्यात आला. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बायकोने नवऱ्याला बीअर पाजून संर्पदश केला, तसेच डोक्यात हेल्मेटनेही मारल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन अज्ञात साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सोनी उर्फ एकता जगताप असं या आरोपी महिलेचं नाव आहे, तर विशाल पाटील असं या घटनेतील पीडित पतीचं नाव आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आरवली येथे श्री देव वेतोबा चरणी लीन…!

news

युक्रेनमधील सध्याची परिस्थिती हा राजकारणाचा किंवा अर्थव्यवस्थेचा प्रश्न नाही तर…..! पंतप्रधान नरेंद्र मोदी

news

कु.चैताली भरतराव कुटेमाटे यांची उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे सहाय्यक सहकार अधिकारी ह्या पदावर निवड…!

news

Leave a Comment