स्टोरी

सावंतवाडी नगरपरिषद आज हुतात्मा दिन साजरा करणार…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी नगरपरिषद आज दि .३० जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा करणार आहे. आज ११ वाजता भोंगा वाजवला जाईल तरी नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.

देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयामार्फत आज दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ठीक १०.५८ वाजता भोंगा वाजविणेत येईल यावेळी शहरातील सर्व नागरिकानी आहे त्या जागेवर उभे राहून आदरांजली वाहावी ,

सकाळी ११ वाजता दूसरा भोंगा देण्यात येईल त्या वेळी सर्वानी पूर्ववत आपले काम सुरू करावे. असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री . सागर साळुंखे यांनी केले आहे


Spread the love

Related posts

श्री देव रामेश्वर- नारायण पालखी सोहळ्यात आ. वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन

news

नोव्हेंबर-डिसेंबर, २०२२ दरम्यान अन्न व औषध प्रशासनामध्ये यो. हि. ढाणे या अधिकाऱ्यास नियमांचा भंग करुन पदस्थापना देण्यात आली?

news

जेष्ठ नागरिकांनी मन नेहमी प्रसन्न ठेवावे! सुरेंद्र सकपाळ यांचे प्रतिपादन

news

Leave a Comment