स्टोरी

अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्र सरकारची घोषणा…!

Spread the love

सावंतवाडी: अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने २२ जानेवारी रोजी केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार या दिवशी केंद्र सरकारची सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहणार आहेत. केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज ही माहिती दिली. रामभक्तांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सिंह यांनी सांगितले. दरम्यान राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

२२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सात दिवस आधी, म्हणजे १६ जानेवारीला मंदिर परिसरात या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या आधी दररोज विशिष्ट विधी केले जात आहेत.


Spread the love

Related posts

शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळने दिली अनोखी भेट.

news

पणजी (गोवा) येथे ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

news

मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत दांडी येथील सौ.निर्झरा जोशी प्रथम!

news

Leave a Comment