स्टोरी

चार वर्षानंतर सावंतवाडी मध्ये रंगणार सुंदरवाडी मिनी महोत्सव…!

Spread the love

सावंतवाडी: शहरांमध्ये चार वर्षानंतर शहरवासीयांच्या मनोरंजनासाठी विविध मनोरंजन कार्यक्रमांनी भरकच्च असलेला सुंदरवाडी मिनी महोत्सव दिनांक २७ ते ३१ डिसेंबरला सावंतवाडी शहरांमध्ये रंगणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व दीपक भाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. विविध पदार्थांचे फूडस्टॉल व घरगुती वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. दिनांक २७ डिसेंबरला बाल गट व खुला गट यांच्यामध्ये जिल्हास्तरीय सोलो डान्स ही रोमांचक स्पर्धा होणार आहेत, तर २८ डिसेंबरला ओमकार कला मंच यांचा सदाबहार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच २९ डिसेंबर रोजी प्रणाली कासले निर्मित ” लावण्यखणी” हा जल्लोष कार्यक्रम होणार आहे. ३० डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब यांचा इनरव्हील ब्युटीक्वीन स्पर्धा होणार आहे तर शेवटच्या दिवशी ३१ डिसेंबरला अक्षता सावंत यांचा रोलर्स म्युझिक नाईट ऑर्केस्ट्रा होणार आहे तरी सावंतवाडी शहरातील रसिक प्रेक्षकांनी या रंगबहार कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी केला आहे. स्टॉल व स्पर्धेसाठी रवी जाधव यांच्याशी संपर्क साधा :- 9405264027


Spread the love

Related posts

कल्याण पूर्वेतील ‘संविधान गुण गौरव’ स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद !

news

सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे..! जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील

news

मुणगे येथील भजन स्पर्धेत कुणकेश्वर मंडळ प्रथम! श्री भगवती देवस्थान कडून आयोजन

news

Leave a Comment