स्टोरी

दाभिल श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी..!

Spread the love

सावंतवाडी: दाभिल गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.

यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कालिका देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे.

यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा जय हनुमान दशावतार कंपनीचे (आरोस) नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच दाभिल ग्रामस्थांनी केले आहे.


Spread the love

Related posts

वायंगणी स्वामी समर्थ मठ येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.

प्रसाद परब

राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा लवकरच तयार करणार! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

अमरनाथ यात्रेला १ जुलै २०२३ पासून होणार सुरुवात!

news

Leave a Comment