स्पोर्ट

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण…!

Spread the love

जलतरण स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण चिवला बीच येथे आयोजित करण्यात आली होती.मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पर्धेला लाभला होता. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणास आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, चषक, मेडल, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

 

 

यावेळी जलतरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक परब, मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत,महेश जावकर, बाबी जोगी,बाबा परब,राजेंद्र पालकर, दिपा शिंदे,सुधाकर शानबाग आदींसह जलतरण संघटनेचे पदाधिकारी, स्पर्धक, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कराटे मार्शल आर्टचे नऊ विद्यार्थी ब्लॅक बेल्ट साठी पात्र.

news

ओटवणेत ध्रुव चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्दघाटन…! गोवा आणि महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडूंच्या क्रिकेटचा थरार.

news

फ्लोरेट कॉलेज इंटेरियर फॅशन डिझायनिंग कणकवली येथे क्रीडा महोत्सव…!

news

Leave a Comment