स्टोरी

पळसंब येथे “किसान गोष्टी” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मालवण व कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिनानिमित्त किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन वरचीवाडी पळसंब, मालवण येथे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मृदा कलशाचे पूजन करुन करण्यात आली. मृदादिनाचे महत्त्व, माती परिक्षण, मृदा आरोग्य पत्रिका व त्यानुसार पिकांस खतांची शिफारस इत्यादी विषयी माहिती मंडळ कृषि अधिकारी श्री डी.के.सावंत यांनी उपस्थितांना दिली. राज्य पुरस्कृत योजना डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनबद्दल माहिती व स्मार्ट योजनेबाबत माहिती नोडल अधिकारी स्मार्ट, सिंधुदुर्ग श्री एल.के.खुरकुटे यांनी उपस्थितांना दिली. तसेच आंबा-काजू मोहोर संरक्षण याविषयीचे मार्गदर्शन कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे विषय विशेषज्ञ श्री सावंत-भोसले सर यांनी केले.

 

यावेळी माती नमुना कसा घ्यावयाचा याबाबतचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर नोडल अधिकारी स्मार्ट, सिंधुदुर्ग श्री खुरकुटे , तालुका कृषि अधिकारी, मालवण श्री गुरव , पुरवठा व मुल्य साखळी तज्ञ तथा कृषि व्यवसाय सल्लागार जिल्हा अंमलबजावणी कक्ष (कृषि) स्मार्ट, सिंधुदुर्ग श्रीम.मुटके मॅडम, कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसचे विषय विशेषज्ञ श्री सावंत-भेसले सर, सरपंच पळसंब श्री महेश वरक व उपसरपंच श्री.अविनाश परब आदी मान्यवर तसेच मालवण तालुका कृषि अधिकारी कार्यालय अधिनस्त सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी वर्ग आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना कृषि पर्यवेक्षक श्रीम.आर.डी.थोरात यांनी केले तर सुत्रसंचालन कृषि सहाय्यक श्री एस. डी. शिंदे यांनी केले.


Spread the love

Related posts

जिल्हाधिकारी यांनी शेती सव्रक्षण प्रलंबित परवाने तरी द्यावेत किंवा अंबा बागेमध्ये एक फॉरेस्ट ऑफिसर बसवावा…!

news

भावी पिढीने महामानवांचे विचार जोपासण्याची गरज..!अर्जुन रावराणे

news

कणकवली, देवगड, वैभववाडी रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तातडीने भरणार….!

news

Leave a Comment