स्टोरी

सोनुर्ली माऊलीच्या चरणी भक्तांची मांदियाळी….!ओटी भरणे व नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी.

Spread the love

प्रशासन व देवस्थान कमिटीचे सुयोग्य नियोजन….

 

सावंतवाडी प्रतिनिधी: दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीच्या वार्षिक जत्रौत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपुर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. सोनुर्ली ‘बाये ‘च्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक व गोवा राज्यातूनही भाविक सोनुर्ली क्षेत्री दाखल झाले होते. सकाळ पासूनच हजारो भाविक देवीचा जयघोष करत माऊली चरणी नतमस्तक होत होते.

तब्बल दोन दिवस चालणाऱ्या सोनुर्ली देवी माऊलीच्या जत्रौत्सवाला मंगळवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली. उत्सवमुर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक व विधीवत पूजन झाल्यानंतर सात वाजल्यापासून देवीचे दर्शन भक्तासाठी खुले करण्यात आले. मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना रांगेत सोडून देवीचे दर्शन देण्यात आले. यावेळी ओटी भरणे व केळी ठेवण्यासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. मंदिरापासून काही अंतरावर दुचाकी व चारचाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आले असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे सोपे झाले होते.

भक्तांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही पोलिस प्रशासनाबरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने योग्य ते नियोजन केलेले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. सकाळपासूनच भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भाविकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या.

तर दुपारपासून ती अधिकच वाढत गेली. भक्तांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी देवस्थान कमिटीकडून मंडप व्यवस्था करण्यात आली होती. माऊलीच्या गाभाऱ्यात ओट्या भरणे केळी ठेवण्याचा कार्यक्रम सुरु होता. स्वयंसेवक नेमून दिलेल्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने योग्य ती खबरदारी घेत होते.


Spread the love

Related posts

सर्व समावेशक कार्य प्रणालीमुळे महेश इंगळे आयकॉन पुरस्काराचे मानकरी….

news

माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचं निधन.

news

इन्सुलि सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना भेटवस्तू वाटप.

newss

Leave a Comment