स्टोरी

श्री देव लिंगेश्वर आधी पंचायतन देवस्थान २५ ऑक्टोबर पासून कलंबिस्त धामणमळा येथील कुलदैवत श्री देवी सातेरी देवीच्या भेटीला.

Spread the love

 

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त धामणमळा येथील कुलदैवत श्री देवी सातेरी मंदिर येथे श्री देव लिंगेश्वर आधी पंचायतन देवस्थान २५ ऑक्टोबर पासून भेटीला गेले आहेत. विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी देवदेवतांची लग्न व सोने लुटण्याचा विधिवत कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरवर्षी सर्व देवता पालखी मिरवणुकीसह श्रीदेवी सातेरी मंदिराच्या भेटीला जातात. यावर्षी आज बुधवारी २५ ऑक्टोबरला सर्व देवता वाजत गाजत पालखी मिरवणुकीने श्री सातेरी देवीच्या भेटीला गेले आहेत. २५ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत श्रीदेवी सातेरी मंदिर येथे सकाळपासून संपूर्ण दिवसभर जागर सुरु आहे. या निमित्ताने सकाळपासून पूजाअर्चा, दुपारी आरती, सायंकाळी आणि रात्री भजन व आधी धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. श्रीदेवी सातेरी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे.


Spread the love

Related posts

कोकण रेल्वे महिला पोलिसांनी रेल्वेस्थानकावर सापडलेली बॅग केरळच्या विद्यार्थिनीला केली परत!

news

ओणी येथे आज आमनेसामने डबलबारी भजन सामना!

news

कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यांची कामे होणार काँक्रिटीकरण.

news

Leave a Comment