स्टोरी

आपला भारत देश एक गाणं असेल तर RSS त्या गाण्याचे सरगम आहे! गायक शंकर महादेवन

Spread the love

२४ ऑक्टोबर वार्ता: आज मंगळवार दि.२४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुर येथील प्रमुख ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गायक शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. शंकर महादेवन यांनी RSS च्या दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केलंय.

शंकर महादेवन यांनी सांगितले की, “संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाल्यावर अनेकांनी माझे अभिनंदनही केले. मी यासाठी भाग्यवान आहे. हा क्षण मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.”

शंकर महादेवन पुढे म्हणाले, ‘आरएसएस परिवारातील सदस्यांनी देशासाठी जे काम केले आहे आणि करतील त्यासाठी मी फक्त त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो. आपल्या संस्कृती आणि परंपरेचे रक्षण करण्यासाठी तुमच्याइतके प्रयत्न देशातील इतर कोणीही केले नाहीत. याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

 

महादेवन पुढे म्हणाले, हा विश्वशांतीचा मंत्र आहे. आपला देश असा आहे की इथे प्रत्येक माणसासाठी प्रार्थना केली जाते. भारत आणि भारताच्या नागरिकांकडे आज संपुर्ण जग आदराने बघतंय. आपला भारत देश एक गाणं असेल तर RSS त्या गाण्याचे सरगम आहे”


Spread the love

Related posts

कलंबिस्त आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान गौरव…!

news

‘मराठी उद्योजक अभिमान गीता’चे उद्योग मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण..! मसुरे सुपुत्र अमित बागवे गीताचे शिल्पकार.

news

बंदी नसलेल्या पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे कायद्याने गुन्हा ठरत नाही! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

news

Leave a Comment