स्टोरी

देवगड कॉलेज नाका येथे उद्या शिवसेना पक्षाचे “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न”अभियान

Spread the love

शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन….

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार देवगड येथे उद्या गुरुवार दि.१२ ऑक्टोबर २०२३ रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त “देवगड कॉलेज रोडवरील कॉलेज नाका” येथे उद्या सकाळी १०.०० वाजता कॉर्नर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

 

या कॉर्नर सभेला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, माजी तालुकाप्रमुख अँड प्रसाद करंदीकर हे उपस्थित राहणार आहेत.

 

तरी सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर , देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, तालुकाप्रमुख जयेश नर, उपतालुका प्रमुख बुवा तारी, रवींद्र जोगल, युवासेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे, तालुकाप्रमुख गणेश गांवकर, महिला संघटक हर्षा ठाकूर, सायली घाडी, शहर प्रमुख संतोष तारी, प्रमोद वळंजू, सुनील तेली, दत्ताराम तिर्लोटकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक मसुरे येथील भरतगड किल्ला शिवमय….

news

कलंबिस्त आणि माडखोल पंचक्रोशीतील ९ गावातील शेतकरी शासनाच्या काजू पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित…!

news

दुचाकी बेळगाव विजापूर येथील बाबू चव्हाण जागीच ठार

news

Leave a Comment