स्टोरी

आता एसटीची सुदधा नॉन एसी स्लीपर बस सेवा

Spread the love


प्रथमच सिंधुदुर्गमधून तीन मार्गांवर धावणार ह्या स्लीपर बस……

 

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सडक मार्गाने प्रवास करण्यासाठी सर्वात सुरक्षित सेवा म्हणून एसटीची सेवा मानली जाते. विविध प्रकारच्या बसेसची सेवा एसटी सध्या देत आहे. त्यात आता भर पडणार आहे ती नवीन नॉन एसी स्लीपर बसच्या सेवेची .महाराष्ट्रात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीन मार्गांवरून नॉन एसी स्लीपर बसची सेवा आता सुरू होत आहे . यासाठी एकूण बीएस-६  ह्या प्रकारच्या सहा बसेस जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत.

बांदा – मुंबई , बांदा – बोरवली आणि बांदा- लातूर या तीन मार्गांवर या कमी प्रदूषण करणाऱ्या बसेस धावणार आहेत . या बसची निर्मिती एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे .या बस मध्ये एकूण ३० शयनयान यांची निर्मिती करण्यात आली आहे .प्रत्येक प्रवाशाला फॅन , रीडिंग लाईट ,सामान ठेवण्यासाठी स्टॅन्ड याची व्यवस्था बसमध्ये करण्यात आली आहे . नॉन एसी स्लीपर बस असल्यामुळे या बसची सेवा रात्रीच्या प्रवासासाठी माफक दरात देण्यात येणार आहे .


Spread the love

Related posts

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ७ आणि अर्थ

news

गणेश चतुर्थी निमित्त कोकणात “झिम पोरी झिम” अशा अनेक गीतांवर महिला ताल धरत पारंपारिक फुगडी खेळात दंग.

news

ब्रेकिंग न्यूज! कोकण रेल्वेमार्गावर ११ आणि १२ जुलैला ‘मेगाब्लॉक’

news

Leave a Comment