स्टोरी

गॅस सिलिंडर झाला स्वस्त.

Spread the love

४ ऑक्टोबर वार्ता: केंद्रशासनाची उज्ज्वला लाभार्थीची सबसिडीची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ६०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केले होते.

 

सिलिंडरची किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना सिलिंडर मिळत होता. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सिलिंडर अवघा ६०० रुपयांना मिळणार आहे.

महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी कपात केली होती. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत १४.२० किलोचा घरगुती गॅस सिलिंडर ९०२.५० रुपये, दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

 


Spread the love

Related posts

घावनळे शाळेच्या शैक्षणिक व भौगोलिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करणार-आ. वैभव नाईक

news

कै. जयवंत लक्ष्मण सावंत यांना १७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपुर्ण श्रद्धांजली….!

news

‘द ग्रेट मावळा’ घाटी अल्ट्रा ट्रेल रन चॅम्पिअनशिप मध्ये सिंधू रनर टीमचा विजयी झेंडा!

news

Leave a Comment