स्टोरी

शहरातील शाळा नगर परिषदेकडे हस्तांतरित करा; माजी नगराध्यक्ष साळगावकर यांची मागणी… – 

Spread the love

सावंतवाडी: महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषद क्षेत्रातील प्राथमिक शाळा स्थानिक नगरपरिषदांकडे हस्तांतरित करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरपरिषद क्षेत्रातील प्राथमिक शाळा, गेली अनेक वर्ष जिल्हा परिषदेच्यावतीने चालविण्यात येतात. नगरपरिषद हद्दीतील शाळा चालण्यासाठी महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदेला सानूग्रह अनुदान देते. त्या अनुदानातून शिक्षकांचे पगार अदा केले जातात. नगरपरिषदेकडील शिक्षणकर महाराष्ट्र शासनाकडे वर्ग केला जातो. जर ह्या शाळा नगरपरिषदेकडे दिल्यास नगर परिषदेच्या पैशातून शहरातील शाळा अद्यावत करता येतील. तसेच स्थानिक नागरिकांनी दिलेला कर शैक्षणिक क्षेत्रामध्ये योग्य ठिकाणी खर्च होईल. त्यामुळे मुला, मुलींसाठी चांगल्या सुविधाही नगरपरिषदेला निर्माण होतील. विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या मागणीचा विचार करून नगरपरिषदांना दिलासा द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे स्वतः नगराध्यक्ष असताना त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे, आता ते स्वतः शिक्षण मंत्री असल्याने त्यांनी या मागणीला तात्काळ मंजुरी द्यावी. असे साळगावकर म्हणाले.


Spread the love

Related posts

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये ‘लेझर’ प्रकाशामुळे २३ वर्षीय तरुणाची दृष्‍टी अधू झाली !

news

वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासह महाराष्ट्रीयन सेलिब्रेटीसह जास्तीत जास्त सेल्फी हा नवीन विक्रम पोपट नलावडे यांच्या नावावर.

news

आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर…!

news

Leave a Comment