स्टोरी

राज्‍यभरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्‍साहात साजरा !

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘आला रे आला गोविंदा आला’, या गोविंदाची गाण्‍यांच्‍या तालावर राज्‍यभरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्‍साहात पार पडला. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी दहीहंडीचे आयोजन केले होते.मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० हून अधिक दहीहंड्यांच्‍या कार्यक्रमांना उपस्‍थिती लावली. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासह विविध राजकीय पक्षाच्‍या नेत्‍यांनी दहीहंडीच्‍या कार्यक्रमांना उपस्‍थिती लावली. या वेळी अनेक ठिकाणी सहस्रावधी नागरिक जमले होते. चित्रपटसृष्‍टीतील कलाकारांनी दहीहंडीच्‍या कार्यक्रमाच्‍या ठिकाणी उपस्‍थिती लावली. दहीहंडीच्‍या कार्यक्रमांसाठी लाखो रुपयांची पारितोषिके ठेवण्‍यात आली होती. दहीहंडी फोडणार्‍या पथकासह अन्‍य पथकांनाही प्रोत्‍साहनपर पारितोषिके देण्‍यात आली.दहीहंडीच्‍या कार्यक्रमांना गर्दी जमवण्‍यासाठी राज्‍यात नृत्‍यांगनांच्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.


Spread the love

Related posts

तलाठ्यानी सजेच्या ठिकाणी उपस्थिती बाबत वेळापत्रक निश्चित करणे बंधनकारक!

news

पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांना मातृशोक…!

प्रसाद परब

तुळसुली येथे हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

news

Leave a Comment