क्राईम

पुणे (बुधवार पेठेत) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

Spread the love

पुणे: पुणे  येथील बुधवार पेठेत  येथील बुधवार पेठ परिसरातून ३१ ऑगस्टला रात्री १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे. हे सर्वजण अवैध पद्धतीने पुण्यात वास्तव्य करतांना आढळून आले आहेत. यात १० बांगलादेशी महिलांसह ९ पुरुषांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बुधवार पेठ परिसरात शोधमोहीम हाती घेत महिला आणि पुरुष यांना अटक केली आहे. हे बांगलादेशी नागरिक बुधवार पेठेत ३ मासांपासून आहेत. त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पुणे पोलीस दलातील सामाजिक सुरक्षादलाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणावर देहविक्री धंदा चालू असतो. बुधवार पेठेत देशविदेशांतील वारांगना देहविक्रय करतात. बांगलादेशातील महिला बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात धडक कारवाई केली.


Spread the love

Related posts

शिकरीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना आंबेगाव शासकीय वनात पडकले.

news

बनावट नोटांची छपाई करून ते चलनात आणणार्‍या ७ आरोपींना अटक!

news

हिजबुल्ला’च्या आतंकवाद्याच्या समर्थनार्थ शिवजन्मभूमी जुन्नर येथे होर्डिंग्ज लावून मोर्चा; सुत्रधारासह सर्व दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करा!

news

Leave a Comment