स्टोरी

अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूरतर्फे महाराष्ट्र बंदची हाक…..

Spread the love

२ सप्टेंबर वार्ता: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असतांना देखील जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षण मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर तेथील पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लाठी चार्ज करण्यात आला. या घटनेमुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याविरोधात अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूरतर्फे आज शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी निषेध आंदोलन केले जाणार असून मराठा महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा तरुण, महिला, वृद्ध, लहान मुले असे हजारोंच्या संख्येने अंतरावली सराटी या गावी मागील चार दिवसापासून उपोषणाला बसले असताना आज दि. १ सप्टेंबर रोजी अचानक पोलिसांचा मोठा ताफा तिथे पूर्ण तयारीने आला आणि त्यांनी अचानक हल्ला चढविला.

 

त्यांच्या या अमानुष हल्यामध्ये महिला, तरुणांची डोके फुटली घराघरात घुसून महिलांना मारहाण करण्यात आली. अश्रृ धुराचे नळकांडे सोडण्यात आले. आंदोलन दडपण्याचे प्रयत्नात, शांततेत चालू असणारे हे आंदोलन अचानक पेटले‌. जे नको होते तेच झाले. या घटनेचा अनेक ठिकाणी निषेध होत आहे. मराठा समाज सरकारवर नाराज असून महासंघाने जालना चे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे.

५४ पेक्षा जास्त लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने शांततेत काढून जगभरात नाव केले . पण या लाठीचार्जमुळें शांततेत होत असलेल्या आंदोलनाला कुठेतरी चिघळण्याचे प्रयत्न केल्या गेले. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागले आहे. ठिकठिकाणी उद्या दि. २ सप्टेंबर रोजी मराठा समाजाने तातडीची बैठक बोलवली आहे. आणि मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार असून या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूरतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही झाली नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येईल. असा इशारा राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे विदर्भ पूर्व अध्यक्ष शशिकांत होणे, नागपूर महानगर अध्यक्ष तेजसिंग मोरे यांनी दिला आहे.


Spread the love

Related posts

वन विभागाकडून सावंतवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान……!

news

सनातन संस्था, सिंधुदुर्गच्यावतीने ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन!

news

मसुरे देऊळवाडा दत्त मंदिर येथे हरिनाम सप्ताह प्रारंभ.

newss

Leave a Comment