स्टोरी

लालूप्रसाद बॅडमिंटन खेळतात, मग जामीन कशासाठी?

Spread the love

२६ ऑगस्ट वार्ता: चारा घोटाळ्याप्रकरणी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा जामीन रद्द करण्यावर शुक्रवार दि.२५ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. लालूप्रसाद यादव यांच्या किडनी प्रत्यारोपणचा हवाला देत सीबीआय त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्याच्या तयारीत असल्याचे लालूंचे वकील अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. याला विरोधात सीबीआयचे वकील म्हणाले की, लालूप्रसाद यादव हे बॅडमिंटन खेळत असतात. त्यामुळे त्यांना जमीन देण्याचा निर्णय चुकीचा असून सुनावणीदरम्यान ते मी सिद्ध करू. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १७ ऑक्टोबरला होणार आहे.

 

जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी या आरोपावरूनही कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्याशिवाय बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, राज्यसभा खासदार मीसा भारतीसह अन्य लोकांच्या विरोधात सीबीआयकडून युक्तिवाद करण्यात आला.

दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना सीबीआयकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले, आगामी 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम भाजप सरकारकडून केले जात आहे.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड आयोजित २० मे रोजी महिला तसेच महिला बचतगटांसाठी भव्य प्रशिक्षण शिबिर! संतोष मयेकर

news

स्वतः बरोबर दुसऱ्याचे जीवन आनंदी करा!श्री श्री १०८ महंत प पू. गावडेकाका महाराज

news

तलाठी परीक्षेत गोंधळ! राज्यात अनेक जिल्ह्यात सर्व्हर डाऊन; हजारो परीक्षार्थी खोळंबले….

news

Leave a Comment