क्राईम

ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघड!

Spread the love

तुळस येथील युवकाला लोन चे आमिष दाखवून एक लाखाला गंडवले..

 

वेंगुर्ले प्रतिनिधी:

तालुक्यातील तुळस-फातरवाडी येथील संदिप पेडणेकर यांची मेन्स सर्व्हीसेस फायनान्स कडून १,०८,०० हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. या संदर्भात राहुल नामक व्यक्तीवर भा.द.वि कलम ४२० व आय.टी. अॅक्ट ६६ (सी) अन्वये वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

तुळस-फातरवाडी येथील संदिप पेडणेकर यांची ७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राहुल नामक बोलणाऱ्या इसमाने तो मेन्स सर्व्हसेस फायनान्स मधून बोलत असल्याचे सांगून आपणांस मेन्स सर्व्हिसेस फायनान्सकडून लोन मिळणार असे खोटे सांगून आपल्याकडून ऑनलाईन १,०८,९१५ एवढी रक्कम पे च्या फोनवर ट्रान्सफर करून घेतली. मात्र लोन न दिल्याने आपली फसवणूक झाली आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये संदिप पेडणेकर यांनी तक्रार दाखल केलेली असून 1 त्यानुसार राहुल नामक इसमावर भा.द.वि. कलम ४२० व आय.टी. अँक्ट ६६(सी) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.


Spread the love

Related posts

सक्का भाऊच बनला वैरी? लवु सावंत खून प्रकरणात अजित सावंत याला अटक

news

प्रियकराने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ रहाणार्‍या प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले!

news

मळगाव येथे किरकोळ करणावरून रिक्षा चालकाला मारहाण….

news

Leave a Comment