क्राईम

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फसवणूकप्रकरणी क्लास मॅनेजरला अटक!

Spread the love

सातारा: येथील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मॅनेजर गजानन ६८ लाख रुपयांची क्लास मालकाचीच फसवणूक केल्याची तक्रार झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच गोरे याला अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. दत्तात्रय गोरे याने इतर तिघांसोबत तब्बल १ कोटी रुपयांचा घोटाळा केला अशी माहिती मिळते.

याप्रकरणी नवनाथ बाळासो देशमुख (वय ३८, रा. देगाव फाटा, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याविषयीं पोलिसांनी दिलेली माहिती अशी तक्रारदार नवनाथ देशमुख हे २००७ पासून शैक्षणिक क्लासेस चालवत आहेत. संशयित गजानन गोरे हा २०१६ पासून देशमुख यांच्या क्लासेसमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून कामाला होता. ग्राहकांना माहिती देणे, त्यांच्याकडून पैसे घेणे, अकौंटचे काम पाहणे, कार्यालयीन बिले भागवणे, रेकॉर्ड सांभाळून ठेवणे अशी गोरे याची मुख्य कामे होती.

 

२०२१ मध्ये तळेगाव दाभाडे येथे तक्रारदार देशमुख यांना आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची निवासी शाखा सुरू करायची असल्याने त्यासाठी गजानन गोरे याला पाठवले. नव्या शाखेसाठी देशमुख यांनी गोरे यास १० लाख रुपये खात्यावर व इतर काही रोख रक्कम दिली होती. तेथे गोरे याने विद्यार्थ्यांकडून ४० हजार रुपयांप्रमाणे ट्यूशनचे पैसे घेतले. शाखा सुरू झाल्यानंतर दरवर्षी त्याचा हिशोब गोरे याने देणे गरजेचे होते. त्यानुसार वर्षाचा हिशोब मागितल्यानंतर मात्र. गोरे याने टाळाटाळ केली. तक्रारदार देशमुख यांनी माहिती घेतल्यानंतर गोरे याने जमा झालेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले असल्याचे समोर आले. ही सर्व फसवणूक १ कोटी ६८ लाख रुपयांची असल्याचे समोर आले.


Spread the love

Related posts

पुणे येथील ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत!

news

दिव-दिमण येथून ३ ट्रेलर ट्रकमधून आणलेली उरण-जासई येथे ७६ लाखाची दारू पकडली.

news

आणि दुर्गा देवी अंगात यायची थांबली

प्रसाद परब

Leave a Comment